Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील; समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:36 AM2024-06-25T07:36:40+5:302024-06-25T07:37:28+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार - विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार - विमर्श कराल... आणखी वाचा
वृषभ: आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील.... आणखी वाचा
मिथुन: आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.... आणखी वाचा
कर्क: आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील... आणखी वाचा
सिंह: आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत... आणखी वाचा
कन्या: आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका.... आणखी वाचा
तूळ: आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.... आणखी वाचा
वृश्चिक: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन - मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडे येणे झाल्याने आपण आनंदी राहाल.... आणखी वाचा
धनु: आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही.... आणखी वाचा
मकर: आजच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील.... आणखी वाचा
कुंभ: आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल.प्रकृती विषयी समस्या उदभवतील. आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.... आणखी वाचा
मीन: आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल.... आणखी वाचा