Today Daily Horoscope: २६ जून २०२४: आनंददायी बातमी मिळेल; कामात यश मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 07:39 AM2024-06-26T07:39:36+5:302024-06-26T07:41:46+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 26 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi news | Today Daily Horoscope: २६ जून २०२४: आनंददायी बातमी मिळेल; कामात यश मिळेल!

Today Daily Horoscope: २६ जून २०२४: आनंददायी बातमी मिळेल; कामात यश मिळेल!

मेष:  आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल.... आणखी वाचा 

वृषभ:  आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल..... आणखी वाचा 

मिथुन:  आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल..... आणखी वाचा 

कर्क:  आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम व चोरी ह्या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा.... आणखी वाचा 

सिंह:  आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही.... आणखी वाचा 

कन्या:  आज कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार - व्यवसायात प्रतिस्पर्धी व विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे..... आणखी वाचा 

तूळ:  आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणे आपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. .... आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. स्थावर संपत्ती व वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा.... आणखी वाचा 

धनु:  आज आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील..... आणखी वाचा 

मकर:  आज 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील.... आणखी वाचा 

कुंभ:  आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल.... आणखी वाचा 

मीन:   आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील..... आणखी वाचा 

Web Title: today daily horoscope 26 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app