Today Daily Horoscope: २७ जून २०२४: आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस, नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 07:20 AM2024-06-27T07:20:07+5:302024-06-27T07:20:44+5:30

 Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 27 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Today Daily Horoscope: २७ जून २०२४: आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस, नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल!

Today Daily Horoscope: २७ जून २०२४: आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस, नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल!

मेष:  आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.  आणखी वाचा 

वृषभ:  आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल.  आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील.  आणखी वाचा 

कर्क: आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल.  आणखी वाचा 

सिंह:  आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

कन्या:  आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल. आणखी वाचा 

तूळ:  आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आज शारीरिक व मानसिकदृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची प्रकृती बिघडेल. आणखी वाचा 

धनु:  आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल.  आणखी वाचा 

मकर:  आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.  आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिकदृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा 

मीन:  आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. आणखी वाचा 

Web Title: today daily horoscope 27 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app