आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 07:18 AM2024-05-27T07:18:46+5:302024-05-27T07:30:47+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आज व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल. आणखी वाचा
वृषभ: आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी उद्भवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
कर्क: आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील. आणखी वाचा
सिंह: रागावर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील व त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
कन्या: आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल. संतती विषयक चिंता सतावेल. शक्यतो प्रवास टाळा. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. स्थावर संपत्ती विषयक कागदपत्रा बद्दल सावध राहावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक: नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रवास घडतील. गूढ विषयांचे आकर्षण होईल. आणखी वाचा
धनु: आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपारनंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती असणार नाही. आणखी वाचा
मकर: आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. वाहन जपून चालवावे लागेल. दुपारनंतर मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण चांगले राहील. हातून परोपकार किंवा एखादे सत्कार्य घडेल.आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपारनंतर कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल. स्वभाव चिडचिडा होईल. आणखी वाचा
मीन: आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचे आयोजन करू शकाल. आणखी वाचा