Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२४: आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल, कामाची प्रशंसा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 08:31 AM2024-06-29T08:31:13+5:302024-06-29T08:31:35+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 29 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२४: आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल, कामाची प्रशंसा होईल!

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२४: आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल, कामाची प्रशंसा होईल!

मेष: आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल.   आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल.  आणखी वाचा 

मिथुन: आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. आणखी वाचा 

कर्क: आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल.  आणखी वाचा 

सिंह:  आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील.  आणखी वाचा 

कन्या: आज दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल.   आणखी वाचा 

तूळ:  आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्याने उत्साह वाढेल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल.  आणखी वाचा 

धनु: आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित होईल. एखादी मानहानी संभवते. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडां कडून सहकार्य मिळून लाभ सुद्धा होतील. आर्थिक लाभ संभवतात.  आणखी वाचा 

कुंभ:  आज वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र व कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.  आणखी वाचा 

Web Title: today daily horoscope 29 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app