Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२३: गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:36 AM2023-11-08T07:36:48+5:302023-11-08T07:37:25+5:30
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आणखी वाचा
मिथुन: भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. आणखी वाचा
कन्या: आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. घरात पत्नी व संतती ह्यांच्या कडून काही सुखद बातमी मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आणखी वाचा
धनु: आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. आणखी वाचा
मकर: आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे ह्याकडे लक्ष राहील. आणखी वाचा
कुंभ: आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा