Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात; बोलण्यावर संयम ठेवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:00 AM2024-09-26T07:00:58+5:302024-09-26T07:12:58+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope: Financial benefits are possible; One has to be restrained in speaking | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात; बोलण्यावर संयम ठेवावा लागेल

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात; बोलण्यावर संयम ठेवावा लागेल

मेष

आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. आणखी वाचा

वृषभ

आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आणखी वाचा

 

मिथुन

आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण - घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. आणखी वाचा

कर्क

आज चंद्र 26 सप्टेंबर, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

सिंह

आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. आणखी वाचा

कन्या

आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल.आणखी वाचा

तूळ

आज चंद्र 26 सप्टेंबर, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आणखी वाचा

वृश्चिक

आज चंद्र 26 सप्टेंबर, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. आणखी वाचा

धनु

आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल.आणखी वाचा

मकर

आज चंद्र 26 सप्टेंबर, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा

कुंभ

आज चंद्र 26 सप्टेंबर, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. आणखी वाचा

मीन

आज चंद्र 26 सप्टेंबर, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल.आणखी वाचा

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope: Financial benefits are possible; One has to be restrained in speaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app