Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२४: आर्थिक फायदा होईल; कोणत्याही कामात आज यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 07:01 AM2024-07-22T07:01:52+5:302024-07-22T07:05:39+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope Today's Horoscope, July 22, 2024: There will be financial gain; You will get success in any work today | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२४: आर्थिक फायदा होईल; कोणत्याही कामात आज यश मिळेल

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२४: आर्थिक फायदा होईल; कोणत्याही कामात आज यश मिळेल

मेष

आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. आणखी वाचा

वृषभ

आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क

आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. आणखी वाचा

सिंह

आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कन्या

आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. आणखी वाचा

तूळ

आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे.  आणखी वाचा

वृश्चिक

आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आणखी वाचा

धनु

आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा 

मकर

आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा

कुंभ

आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. आणखी वाचा

मीन

आज मित्रां कडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. आणखी वाचा 

Web Title: Today Daily Horoscope Today's Horoscope, July 22, 2024: There will be financial gain; You will get success in any work today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app