Today Horoscope: सरकारी कामातून फायदा होईल; तुमची राशी काय सांगतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 07:39 IST2025-02-13T07:37:49+5:302025-02-13T07:39:59+5:30

Marathi horoscope today: तुमचा दिवस कसा जाणार? तुमची राशी काय सांगतये? जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

today horoscope in marathi 13 February 2025 lokmat horoscope | Today Horoscope: सरकारी कामातून फायदा होईल; तुमची राशी काय सांगतेय?

Today Horoscope: सरकारी कामातून फायदा होईल; तुमची राशी काय सांगतेय?

मेष
कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष द्यावे लागेल.
आणखी वाचा 

वृषभ
आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल. 
आणखी वाचा 

मिथुन
आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज भासेल. सूर्य संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी सामान्याहून चांगला आहे. आपले साहस वाढेल. आपण एखादी नवीन जोखीम घेऊ शकाल. 
आणखी वाचा 

कर्क
आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अवैध बाबीं पासून दूर राहावे. आज खर्चाचे प्रमाण वाढेल. सूर्याचे कुंभेतील गोचर आपल्यासाठी काहीसे चिंताजनक ठरेल. असेअसले तरी हा महिना आपल्यासाठी सकारात्मक सुद्धा राहील. ह्या दरम्यान मेहनतीस घाबरू नका. मन लावून मेहनत करा. आपणास नशिबाची साथ मिळेल.
आणखी वाचा 

सिंह
आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणे - वागणे संयमित ठेवावे लागेल. रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सूर्याचे कुंभेतील भ्रमण आपल्यासाठी चांगलेच राहणार आहे. ह्या दरम्यान आपणास गोचर भ्रमणाचा सकारात्मक प्रभाव बघावयास मिळेल. ह्या दरम्यान जमीन किंवा वाहन खरेदी सुद्धा होऊ शकते.
आणखी वाचा 

कन्या
आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अचानकपणे खर्च वाढतील. शक्यतो वाद व संघर्ष ह्यापासून दूर राहावे. सूर्य संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे.
आणखी वाचा 

तूळ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल. कुंभ राशीतील सूर्याच्या भ्रमणामुळे हा एक महिना आपल्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.
आणखी वाचा 

वृश्चिक
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे आनंदित व्हाल. सूर्याचे कुंभेतील भ्रमण आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे.
आणखी वाचा 

धनु
आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी दोन हात करावे लागतील. सूर्याचे कुंभेतील गोचर भ्रमण आपल्यासाठी खूपच चांगले आहे. ह्या दरम्यान आपण आशावादी झाल्याचे दिसून येईल.
आणखी वाचा 

मकर
आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल. सूर्य आता आपल्या राशीतून कुंभेत प्रवेश करत आहे. सूर्याचे हे कुंभेतील गोचर भ्रमण आपल्यासाठी चांगले राहील.
आणखी वाचा 

कुंभ
आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारां कडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल. सूर्य आता आपल्या राशीतून भ्रमण करणार आहे. सूर्याचे हे भ्रमण आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून येईल.
आणखी वाचा 

मीन
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरून एखादी चांगली बातमी मिळेल. सूर्याचे कुंभेतील गोचर भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. विरोधकांवर आपण मात कराल.
आणखी वाचा 

Web Title: today horoscope in marathi 13 February 2025 lokmat horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app