Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १५ नोव्हेंबर २०२२: एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल, मध्यम फलदायी दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 07:23 AM2022-11-15T07:23:28+5:302022-11-15T07:24:24+5:30
Today's Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,काय सांगते तुमची राशी...
मेष- चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आणखी वाचा
वृषभ- चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा
मिथुन- चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील. आणखी वाचा
कर्क- चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. आणखी वाचा
सिंह- चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. आणखी वाचा
कन्या- चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. आणखी वाचा
तूळ- चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. आणखी वाचा
वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. आणखी वाचा
धनु- आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. आणखी वाचा
मकर- आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कुंभ- आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. आणखी वाचा
मीन- आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा