आजचे राशीभविष्य, १८ जून २०२४ : कर्कसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 07:16 AM2024-06-18T07:16:17+5:302024-06-18T07:17:02+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे - फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात - निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आणखी वाचा
मिथुन- आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. आणखी वाचा
कर्क- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख होईल. आणखी वाचा
सिंह- आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा
कन्या - आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा
तूळ- आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आपली कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र व कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आणखी वाचा
वृश्चिक- आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल. आणखी वाचा
धनु- आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. आणखी वाचा
मकर- आज व्यापार - व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते. आणखी वाचा
कुंभ- शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा
मीन- आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात सुद्धा प्रतिकूलता जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल. आणखी वाचा