आजचे राशीभविष्य, १९ जून २०२४ : दागिन्यांची खरेदी करू शकाल, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 07:35 AM2024-06-19T07:35:42+5:302024-06-19T07:36:05+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 19 June 2024 : You will be able to buy jewelry, you will get respect in the social sphere. | आजचे राशीभविष्य, १९ जून २०२४ : दागिन्यांची खरेदी करू शकाल, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल

आजचे राशीभविष्य, १९ जून २०२४ : दागिन्यांची खरेदी करू शकाल, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल

मेष -  आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. दुपार नंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल.  आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील.  आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा

कर्क-  आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. आणखी वाचा

सिंह- आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आणखी वाचा

कन्या - आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळावे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील.  आणखी वाचा

तूळ- आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. दुपार नंतर आपली मानसिकता बदलेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील.   आणखी वाचा

वृश्चिक-  आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता आहे.  आणखी वाचा

धनु- आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर- आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. आणखी वाचा

मीन- आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपार नंतर अनुकूलता लाभेल.  आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 19 June 2024 : You will be able to buy jewelry, you will get respect in the social sphere.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app