आजचे राशीभविष्य, २ फेब्रुवारी २०२४ : कर्कसाठी काळजीचा तर मेषसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 07:08 AM2024-02-02T07:08:34+5:302024-02-02T07:09:10+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 2 February 2024 : A day of worry for Cancer and joy for Aries | आजचे राशीभविष्य, २ फेब्रुवारी २०२४ : कर्कसाठी काळजीचा तर मेषसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य, २ फेब्रुवारी २०२४ : कर्कसाठी काळजीचा तर मेषसाठी आनंदाचा दिवस

मेष- आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील.  आणखी वाचा

मिथुन-  आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क- आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने सुद्धा मन दुःखी होईल. आणखी वाचा

सिंह-  आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. आणखी वाचा

कन्या - आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.  आणखी वाचा

तूळ- आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज - मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल.  आणखी वाचा

वृश्चिक-  आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो.  आणखी वाचा

धनु- आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. आणखी वाचा

मकर- आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा

कुंभ- आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही.  आणखी वाचा

मीन- आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल.  आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 2 February 2024 : A day of worry for Cancer and joy for Aries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app