आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२३; वाद-विवाद, बौद्धिक चर्चांपासून दूर राहावे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:28 AM2023-02-21T07:28:50+5:302023-02-21T07:29:48+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - 21 February 2023; Stay away from arguments and intellectual discussions for libra | आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२३; वाद-विवाद, बौद्धिक चर्चांपासून दूर राहावे

आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२३; वाद-विवाद, बौद्धिक चर्चांपासून दूर राहावे

googlenewsNext

मेष - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. आणखी वाचा

मिथुन - मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. आणखी वाचा

कर्क - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. आणखी वाचा 

सिंह - आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. आणखी वाचा

कन्या - आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आणखी वाचा

मकर - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. आणखी वाचा

मीन - आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - 21 February 2023; Stay away from arguments and intellectual discussions for libra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app