आजचे राशीभविष्य - २१ जून २०२४; आर्थिक लाभ संभवतात, विरोधकांवर मात करू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:15 AM2024-06-21T07:15:48+5:302024-06-21T07:19:48+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope 21 June 2024 Financial benefits are possible, you will be able to overcome opponents | आजचे राशीभविष्य - २१ जून २०२४; आर्थिक लाभ संभवतात, विरोधकांवर मात करू शकाल

आजचे राशीभविष्य - २१ जून २०२४; आर्थिक लाभ संभवतात, विरोधकांवर मात करू शकाल

मेष

आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. आणखी वाचा

वृषभ

21 जून, 2024 शुक्रवारी चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. आणखी वाचा

मिथुन

आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. आणखी वाचा

सिंह

आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल.आणखी वाचा

कन्या

आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आणखी वाचा

तूळ

आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आणखी वाचा

वृश्चिक

आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आणखी वाचा

धनु

कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपार नंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखी वाचा

मकर

आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा

कुंभ

आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. आणखी वाचा

मीन

आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 21 June 2024 Financial benefits are possible, you will be able to overcome opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app