आजचे राशीभविष्य, २१ नोव्हेंबर २०२३ : वृश्चिकसाठी काळजीचा तर कन्येसाठी लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 07:32 AM2023-11-21T07:32:44+5:302023-11-21T07:44:43+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope : 21 November 2023 : A day of worry for Scorpio and gain for Virgo | आजचे राशीभविष्य, २१ नोव्हेंबर २०२३ : वृश्चिकसाठी काळजीचा तर कन्येसाठी लाभाचा दिवस

आजचे राशीभविष्य, २१ नोव्हेंबर २०२३ : वृश्चिकसाठी काळजीचा तर कन्येसाठी लाभाचा दिवस

मेष- आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी व निम-सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील.  आणखी वाचा

मिथुन- आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. आणखी वाचा

कर्क- आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या - पिण्याकडे लक्ष दिले नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. आणखी वाचा

सिंह- आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति - पत्नी दोघांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टी पासून मन अलिप्त होईल. आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

तूळ- आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद - विवाद व चर्चेत पडू नका. आरोग्याच्या बाबतीत पचनक्रिये संबंधी तक्रारी राहतील. आणखी वाचा

वृश्चिक- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही व त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे किंवा कागदपत्रे करण्या विषयी जपून राहावे. आणखी वाचा

धनु- आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभ संभवतो.  आणखी वाचा

मकर- आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर - सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी उदभवतील.  आणखी वाचा

कुंभ-  आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल.  आणखी वाचा

मीन- आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल. मित्र - स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल.  आणखी वाचा

 

Web Title: Today's Horoscope : 21 November 2023 : A day of worry for Scorpio and gain for Virgo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app