आजचे राशीभविष्य, २२ नोव्हेंबर २०२३ : आर्थिक लाभ होईल, कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 07:09 AM2023-11-22T07:09:58+5:302023-11-22T07:10:20+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. आणखी वाचा
वृषभ - आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार - व्यवसायात यश मिळवू शकाल. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा
कर्क- आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आणखी वाचा
सिंह- आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. आणखी वाचा
तूळ- लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक- आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. आणखी वाचा
धनु- आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा
मकर- आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. आणखी वाचा
कुंभ- आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल. आणखी वाचा
मीन- आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा