आजचे राशीभविष्य, २५ जानेवारी २०२४ : नोकरीत बढतीची संधी लाभेल, वैवाहिक जीवनात गोडवा राहील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 07:20 AM2024-01-25T07:20:02+5:302024-01-25T07:21:12+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
वृषभ - आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. आणखी वाचा
कर्क- आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा
सिंह- आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र - मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. व्यापारात धन वृद्धी संभवते. आणखी वाचा
तूळ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आणखी वाचा
वृश्चिक- आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. आणखी वाचा
धनु- आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल. उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. आणखी वाचा
मकर- दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. आणखी वाचा
कुंभ- आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साही व आनंदी असेल. आणखी वाचा
मीन- आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. आणखी वाचा