आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२४ : कर्कसाठी लाभदायी तर मकरसाठी चिंतेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 07:10 AM2024-08-26T07:10:44+5:302024-08-26T07:11:01+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 26th August 2024 : Beneficial day for Cancer and worrying day for Capricorn | आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२४ : कर्कसाठी लाभदायी तर मकरसाठी चिंतेचा दिवस

आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२४ : कर्कसाठी लाभदायी तर मकरसाठी चिंतेचा दिवस

मेष -  आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.  आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल.  आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आणखी वाचा

कर्क-  आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा

सिंह- खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.  आणखी वाचा

कन्या - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्‍या चर्चेमुळे आनंद होईल. आणखी वाचा

तूळ- आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक-  आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील. आणखी वाचा

धनु- आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. आणखी वाचा

मकर- आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. आणखी वाचा

कुंभ- आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 26th August 2024 : Beneficial day for Cancer and worrying day for Capricorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app