आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२४ : धनुसाठी आनंदाचा तर कुंभसाठी काळजीचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 07:31 AM2024-08-29T07:31:07+5:302024-08-29T07:31:42+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. आणखी वाचा
वृषभ - आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. आणखी वाचा
कर्क- आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उदास होईल. आणखी वाचा
सिंह- आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. आणखी वाचा
कन्या - आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. आणखी वाचा
तूळ- आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. आणखी वाचा
वृश्चिक- आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. आणखी वाचा
धनु- मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. आणखी वाचा
मकर- आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा
कुंभ- आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. आणखी वाचा
मीन- आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. आणखी वाचा