आजचे राशीभविष्य, ५ एप्रिल २०२४ : कुटुंबात सुख-शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:17 AM2024-04-05T07:17:17+5:302024-04-05T07:17:55+5:30
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. आणखी वाचा
वृषभ - आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल. आणखी वाचा
मिथुन- आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळे त्यापासून दूर राहणे हितावह होईल. आणखी वाचा
कर्क- आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. आणखी वाचा
सिंह- आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. आणखी वाचा
कन्या - आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. वस्त्र व अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष आवड निर्माण होईल. आणखी वाचा
तूळ- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. कुटुंबात वाद संभवतात. आणखी वाचा
वृश्चिक- आजचा दिवस व्यावसायिकांना अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होऊ शकेल. भावंडांशी जवळीक साधू शकाल. आणखी वाचा
धनु- आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. दुपार नंतर काळजी दूर होण्याचे उपाय मिळतील. आणखी वाचा
मकर- आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडेल. दांपत्य जीवनातील वातावरणात कटुता निर्माण होईल. गूढ विषयांत गोडी निर्माण होईल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. आणखी वाचा
कुंभ- आज आपल्यातील धार्मिक भावना उफाळून येईल. आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. मनःशांतीसाठी केलेल्या प्रयत्नांत यशप्राप्ती होईल. आणखी वाचा
मीन- आज शेअर- सट्टा ह्यातून काही आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल. आणखी वाचा