आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 08:28 AM2024-11-01T08:28:04+5:302024-11-01T08:34:16+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सुख - समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल. आणखी वाचा
वृषभ - आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा - गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज - मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
कर्क - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. आणखी वाचा
सिंह - आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा
कन्या - कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आणखी वाचा
तूळ - आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामे सफल बनतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक व आनंददायी असेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. कुटुंबीय किंवा सगे - सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. आणखी वाचा
धनु - आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती ह्यांच्या कडून लाभ संभवतो. आणखी वाचा
मकर - आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितां कडून फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आणखी वाचा
कुंभ - आज आपण जरी शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. आणखी वाचा
मीन - आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. आणखी वाचा