आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 07:25 AM2024-08-16T07:25:58+5:302024-08-16T07:33:18+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 16 August 2024 | आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता

आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता


मेष - आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी व कुटुंबात मतभेद होतील. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपणास सकारात्मक परिणाम देणारे आहे. आणखी वाचा

वृषभ - आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आपल्या खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सूर्याचे सिंहेतील भ्रमण आपल्यासाठी लाभदायी होऊ शकते. संपत्ती इत्यादींची खरेदी करण्यास अनुकूलता लाभेल.  आणखी वाचा

मिथुन - आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपणास लाभदायी होईल. हा एक महिना आपणास अनुकूल असेल. धन प्राप्तीची संधी मिळेल. आपले साहस वृद्धिंगत होईल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्‍या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील. सूर्याचे सिंहेतील हे गोचर भ्रमण आपणास अनुकूल आहे. आपणास अनेक प्रकारचे फायदे होतील. आणखी वाचा 

सिंह - आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल. सूर्य आता आपल्याच राशीतून भ्रमण करणार असल्याने आपणास नशिबाची साथ मिळेल असे समजण्यास हरकत नाही. आणखी वाचा

कन्या - आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्या पासून धोका संभवतो. सूर्याच्या सिंहेतील भ्रमणाच्या प्रभावाने आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. आणखी वाचा

तूळ -  नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज शारीरिक व मानसिक स्वस्थता अनुभवू शकाल. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपणास अनुकूल आहे. प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होऊ शकतात. आणखी वाचा

वृश्चिक - आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. धनलाभ होईल. कौटुंबिक प्रश्न सहजगत्या सोडवाल. विद्यार्थ्यांना हमखास यश मिळेल. सूर्याचे सिंहेतील भ्रमण आपल्यासाठी अनुकूल आहे. आपणास नशिबाची साथ मिळेल. असे असले तरी आपणास परिश्रम करावेच लागतील. आणखी वाचा

धनु - आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी राहील. मान - मरातब वाढेल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. सूर्याच्या सिंहेतील गोचरामुळे आपणास कार्यक्षेत्री लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. व्यापारात सुद्धा लाभ होईल. आणखी वाचा

मकर - आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. एखादी दुर्घटना संभवते. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपल्यासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. सूर्याच्या सिंहेतील गोचर भ्रमणामुळे आपल्या मित्रांच्या संख्येत वाढ होईल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्‍यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल. पित्याकडून लाभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आपली मान - प्रतिष्ठा उंचावेल. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपल्यासाठी उन्नतीदायक ठरेल. आपण अध्ययनात खूप मेहनत घ्याल व त्याचा आपणास फायदा सुद्धा होईल. आपणास नोकरीत नवीन संधी मिळेल. आणखी वाचा

 

 

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 16 August 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app