आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:23 AM2022-07-08T07:23:23+5:302022-07-08T08:18:44+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 8 july 2022 | आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील

आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील

googlenewsNext

मेष -  अडचणी दूर होतील. यश मिळेल. बोलण्यावर थोडे नियंत्रइण ठेवायला हवे. व्यवसायात भरभराट होईल. भाऊ बहीण आणि जवळचे नातेवाईक यांच्यासेबत मौजमजेत वेळ घालवता येईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील काही अकल्पित लाभ होतील.

वृषभ - आर्थिक अवक चांगली राहील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाने वागण्याची गरज आहे. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. योग्य मार्गदर्शनामुळे मनात आत्मविश्वास राहील. 

मिथुन - मनात सकारात्मक विचार राहतील. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. 

कर्क - घरी येणारे-जाणारे यांचा राबता राहील. त्यामुळे कामाचा ताण राहील. वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत बदलीची शक्यता आहे. मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामानिमित्त फिरणे होईल. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. 

सिंह - जवळपासचे प्रवास होतील. प्रवासात सतर्क राहा. भावंडांशी गैरसमज होतील. व्यवसायात दगदग धावपळ होईल गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. 

कन्या - आर्थिक आवक चांगली राहील. मात्र देण्या - घेण्याचे व्यवहार जपून करा. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. काहींना ' प्रमोशन ' मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. 

तूळ - जीवनसाथीच्या कलाने घ्या. वितंडवाद होणार नाही, याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. भाग्याची साथ राहील. मुलांना घवघवीत यश मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील, असे प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. हलका आहार घेणे ठीक राहील. 

वृश्चिक - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासात दगदग होईल. थोडे नियोजन करा. आरोग्याची काळजी घ्या. मुले प्रगती करतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल.

धनू - आर्थिक व्यवहार जपून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. व्यवसायात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. एखादा धाडसी निर्णय घ्याल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. पदोन्नती होऊ शकते. 

मकर - नोकरीत कामाचा ताण वाढेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल सहकारी, अधिकारी यांच्याशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरी पाहुणे येतील. मुले अभ्यासात प्रगती करतील. त्यांचे कौतुक होईल. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील.

कुंभ - अडचणी कमी होतील. मात्र जिवाला स्वस्थता राहणार नाही. कशात ना कशात व्यस्त राहाल. प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. नोकरीत सोप्या रीतीने कामे पार पडतील. 

मीन - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. नोकरीत तुमचे पारडे जड राहील घरात तुमच्या मर्जीनुसार निर्णय घेतला जाईल. व्यवसायात भरभराट होईल. 
- विजय देशपांडे ( ज्योतिष विशारद )
 

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 8 july 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app