आजचे राशीभविष्य : नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल, वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 07:32 AM2023-10-22T07:32:53+5:302023-10-22T07:40:12+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा
वृषभ - आज परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील. आणखी वाचा
मिथुन - आज कोणत्याही प्रकारच्या संकटापासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा
कर्क - आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील. प्रेमिकांना प्रणयात सफलता प्राप्त होईल. आणखी वाचा
सिंह - आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्याधीमुक्त व्हाल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील व लाभ सुद्धा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर - सट्टा यांपासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा
तूळ - आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. सर्व कामे पूर्ण होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील. आणखी वाचा
मकर - आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल. आणखी वाचा
कुंभ - आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा