आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 07:24 AM2024-10-27T07:24:47+5:302024-10-27T07:43:53+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. आणखी वाचा
वृषभ - आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचा
मिथुन - आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. आज आपणाला काही लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क - आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. आणखी वाचा
सिंह - आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील व वडीलधार्यां कडून लाभ होईल. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. आणखी वाचा
कन्या -आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. आणखी वाचा
तूळ - आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात खुश राहाल. प्रवास आनंददायी होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान - प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठ व वडिलधार्यांची मर्जी राहील. येणी वसूल होतील. आणखी वाचा
धनु - आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. शारीरिक व मानसिक व्यग्रता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मकर - आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. सार्वजनिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. आणखी वाचा
कुंभ - प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा
मीन - आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा