आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांचे कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात, धनहानी व मानहानी संभवते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:18 AM2024-08-22T07:18:53+5:302024-08-22T07:31:37+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. आणखी वाचा
वृषभ - आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. आणखी वाचा
मिथुन - आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. आणखी वाचा
कर्क - आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. आणखी वाचा
सिंह - आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. आणखी वाचा
तूळ - आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा ह्यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. आणखी वाचा
धनु - आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावे. धनहानी व मानहानी संभवते. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आणखी वाचा
कुंभ - आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा
मीन - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. धनप्राप्ती संभवते. एखाद्या प्रवासात किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल. आणखी वाचा