आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:25 AM2024-10-24T07:25:02+5:302024-10-24T07:42:22+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 24 October 2024 | आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता

आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता


मेष - आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. आणखी वाचा

वृषभ - आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. आणखी वाचा

मिथुन - आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. आणखी वाचा

कर्क - मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह - आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित व विवेकी राहावे लागेल. आणखी वाचा

कन्या -  आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल.  आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. आणखी वाचा

धनु - आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी व वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. आणखी वाचा

मकर - विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. तब्बेत उत्तम राहील. वाहन सौख्य व सन्मान प्राप्ती होईल. एखादा मनोरंजक प्रवास घडेल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा

मीन - आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे.मानसिक संतुलन सांभाळावे लागेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 24 October 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app