आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:29 AM2024-05-28T07:29:42+5:302024-05-28T07:41:41+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. आणखी वाचा
वृषभ - आज परदेशस्थ स्नेहीजनांकडून व मित्र वर्गाकडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढला तरी सुद्धा आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन - आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. समाजात मान - सन्मान वाढेल. आणखी वाचा
सिंह - आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये. आणखी वाचा
तूळ - आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल. आणखी वाचा
धनु - आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. घरी व नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा
मकर -आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आणखी वाचा
कुंभ - आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. आणखी वाचा
मीन - आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. आणखी वाचा