आजचे राशीभविष्य : बुधवार १४ ऑगस्ट २०२४; या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 07:32 AM2024-08-14T07:32:17+5:302024-08-14T07:43:07+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 14 August 2024 | आजचे राशीभविष्य : बुधवार १४ ऑगस्ट २०२४; या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल

आजचे राशीभविष्य : बुधवार १४ ऑगस्ट २०२४; या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल

मेष - आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा ठरेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आणखी वाचा

वृषभ - आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश - कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. तरी सुद्धा आपण वाणी व क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. आणखी वाचा 

सिंह -  आज कुटुंबातील वातावरण वाद - विवादाचे राहील. आजचा दिवस जमीन, घर, वाहन इत्यादी व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास अनुकूल नाही. नोकरदारांना पण दिवस अनुकूल नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा. आणखी वाचा

कन्या - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल. आपले नुकसान टाळण्यासाठी कोणतेही काम विचार पूर्वकच करावे. आणखी वाचा

तूळ - आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. स्नेही व मित्रवर्ग यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आनंददायी प्रवास घडेल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर - सट्टा ह्यात धन लाभ होईल. मित्र व संबंधित ह्यांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

कुंभ - आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल. आणखी वाचा

मीन - आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 14 August 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app