आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 07:41 AM2024-05-29T07:41:13+5:302024-05-29T07:52:06+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
वृषभ - आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. आणखी वाचा
मिथुन - आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा
कर्क - आज नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील. प्रेमिकांना प्रणयात सफलता प्राप्त होईल. आणखी वाचा
सिंह - आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा
तूळ - माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा
वृश्चिक - घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल. आणखी वाचा
धनु - कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील. आणखी वाचा
मकर - प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल. आणखी वाचा
कुंभ - आज खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा