आजचे राशीभविष्य - ११ डिसेंबर २०२३, आपल्या कृतीवर संयम ठेवा, हितशत्रूंचा त्रास संभवतो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 07:16 AM2023-12-11T07:16:09+5:302023-12-11T07:17:16+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - December 11, 2023, be careful in your actions, trouble from well-wishers is possible | आजचे राशीभविष्य - ११ डिसेंबर २०२३, आपल्या कृतीवर संयम ठेवा, हितशत्रूंचा त्रास संभवतो

आजचे राशीभविष्य - ११ डिसेंबर २०२३, आपल्या कृतीवर संयम ठेवा, हितशत्रूंचा त्रास संभवतो

मेष -  आज चंद्र 11 डिसेंबर, 2023 सोमवार तूळ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल. शत्रूंचा उपद्रव वाढेल. आणखी वाचा 

वृषभ -  आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल. आणखी वाचा    

मिथुन  - आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपार नंतर व्यवसायात लाभ संभवतो. आणखी वाचा 

कर्क  - आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

सिंह - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. नैराश्य येण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

कन्या - आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र अनुकूल वातावरण निर्माण होईल.  आणखी वाचा  

तूळ  -  आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. शक्यतो कुटुंबियांशी मतभेद टाळावेत. आणखी वाचा 

वृश्चिक -आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.  आणखी वाचा 

धनु - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस त्रास संभवतो. विचार पूर्वक कामे न केल्यास आपण अडचणीत येऊ शकाल. आणखी वाचा 

मकर - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. दुपार नंतर मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा 

कुंभ - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर मात्र कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल.  आणखी वाचा 

मीन - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल.  आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - December 11, 2023, be careful in your actions, trouble from well-wishers is possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app