आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३, स्त्रियांना माहेरहून आनंदाची वार्ता, 'या' राशींना धनलाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 07:17 AM2023-12-15T07:17:37+5:302023-12-15T07:20:29+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. आणखी वाचा
वृषभ - आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. आणखी वाचा
कर्क - आपल्या राशी पासून चंद्र सहावा असेल. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा
सिंह - आपल्या राशी पासून चंद्र पाचवा असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा
कन्या - आपल्या राशी पासून चंद्र चवथा असेल. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. आणखी वाचा
तूळ - आपल्या राशी पासून चंद्र तिसरा असेल. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा असेल. नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. आणखी वाचा
धनु - आपल्या राशी पासून चंद्र प्रथम असेल. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. आणखी वाचा
मकर - आपल्या राशी पासून चंद्र बारावा असेल. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
कुंभ - आपल्या राशी पासून चंद्र लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. आणखी वाचा
मीन - आपल्या राशी पासून चंद्र दशमात असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. आणखी वाचा