आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२४: आर्थिक बाजू मजबूत होईल; मन मात्र भरकटत राहील, प्रकृतीकडे लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 07:40 AM2024-02-10T07:40:09+5:302024-02-10T07:40:22+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Today's Horoscope, February 10, 2024: Financial aspect will be strengthened; But the mind will continue to wander, pay attention to the nature | आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२४: आर्थिक बाजू मजबूत होईल; मन मात्र भरकटत राहील, प्रकृतीकडे लक्ष द्या

आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२४: आर्थिक बाजू मजबूत होईल; मन मात्र भरकटत राहील, प्रकृतीकडे लक्ष द्या

मेष- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा

वृषभ- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. आणखी वाचा

मिथुन- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आणखी वाचा

कर्क- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. आणखी वाचा

सिंह- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील. आणखी वाचा

कन्या- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा

तूळ- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आणखी वाचा

धनु- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. आणखी वाचा

मकर- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. आणखी वाचा

कुंभ- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. आणखी वाचा

मीन- 10 फेब्रुवारी, 2024 शनिवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावे लागेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, February 10, 2024: Financial aspect will be strengthened; But the mind will continue to wander, pay attention to the nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app