आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२२; यशदायक काळाचा अनुभव घ्याल, पैशांची बचत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 07:35 AM2022-07-12T07:35:06+5:302022-07-12T07:38:31+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - भाग्याची चांगली साथ राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. काहींना प्रवास घडून येईल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. मित्रमैत्रिणी, जवळचे लोक यांची चांगली साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील. तुमचा नावलौकिक वाढेल.
वृषभ - धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मनासारखे भोजन मिळेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत दगदग होईल. कामाचा व्याप राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
मिथुन - कामातील अडचणी दूर होतील. सुलभतेने कामे मार्गी लागतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. गृहसौख्य चांगले राहील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. पैसे मिळण्याची फक्त कोरडी आश्वासने मिळतील. त्यानुसार खर्चाचे नियोजन करा.
कर्क - धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. हाती आलेल्या पैशांची बचत केली पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाह करू नका. वेळच्या वेळी औषधोपचार घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.
सिंह - प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. सहजासहजी यश मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील.
कन्या - नोकरीत तुमचा दबदबा राहील. सहकारी मदत करतील. तुमच्या शब्दाला किंमत राहील. काहींना नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. प्रवासकार्य साधक ठरतील. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल.
तूळ - कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. भावंडाच्या भेटीगाठी होतील. आर्थिक गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. कदाचित बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या.
वृश्चिक - धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीचे कामे मार्गी लागण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मुले प्रगती करतील.
धनू - मनात आनंदी विचार राहतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. जीवनसाथीशी गैरसमज होतील. मात्र वाद विकोपाला जाणार नाहीत. आपण थोडा संमजसपणा दाखवला पाहिजे. प्रवासात सतर्क राहावे. मुलाच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करा.
मकर - अनावश्यक खर्चाला आवार घातला पाहिजे. काहींना प्रवास करावा लागेल. जीवनसाथीची काळजी घ्या. काय हवे नको ते विचारा. नोकरीत वादविवाद होऊ शकतात. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आर्थिक आवक सामान्य राहील.
कुंभ - यशदायक काळाचा अनुभव घ्याल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. बहीण-भावांची काळजी वाटेल. मुले अभ्यासात प्रगती करतील.
मीन - व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यात तुमचा फायदा होईल. घरी पाहुणे येतील. बहीण भाऊ यांच्यासमवेत वेळ मजेत जाईल. जीवनसाथी साथ देईल.
विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)