आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२२; कोणत्याही कामात आज यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:16 AM2022-07-16T07:16:37+5:302022-07-16T07:17:23+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला - मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आणखी वाचा
वृषभ - आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. आणखी वाचा
कर्क - आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कन्या - आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा
तूळ - आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्या पासून दूर राहणे हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. आणखी वाचा
वृश्चिक - आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान - सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आप्तेष्टां कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंददित व्हाल. आणखी वाचा
कुंभ - आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल.प्रकृती विषयी समस्या उदभवतील. आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहावे. आणखी वाचा
मीन - आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र - स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. आणखी वाचा