आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२३:...तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचे धाडस करू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 07:22 AM2023-07-20T07:22:37+5:302023-07-20T07:22:59+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?
मेष- 20 जुलै, 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपूनटाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक व मानसिक दृष्टया त्रस्त व्हाल. निद्रानाश झाल्यामुळे आरोग्यावर ताण येईल. बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्याने आनंदित व्हाल, मात्र त्यात वाद निर्माण होणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी लागेल. आणखी वाचा
वृषभ- आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभ संभवतात. परंतु दुपार नंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. आणखी वाचा
मिथुन- आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील.मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचे धाडस करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा
कर्क- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. आणखी वाचा
सिंह- आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. गैरसमज व मतभेद होण्याची शक्यता असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
कन्या- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
तूळ- , 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आर्थिक नियोजन निष्ठापूर्वक कराल. तब्बेत उत्तम राहील. मानसिक शांतता लाभेल. आणखी वाचा
वृश्चिक- आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. आपले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. मातेशी सौहार्दता राहील. सामाजिक मान - सन्मान प्राप्त होतील. आणखी वाचा
धनु- आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. अचानक धन प्राप्ती संभवते. आणखी वाचा
मकर- आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. आणखी वाचा
कुंभ- आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहनसौख्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात कीर्ती होईल. वस्त्र व अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
मीन- आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभल्याने समाधान होईल. आणखी वाचा