आजचे राशीभविष्य, २८ जून २०२३ : कर्कसाठी काळजीचा अन् कन्येसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:23 AM2023-06-28T07:23:12+5:302023-06-28T07:23:34+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, June 28, 2023 : A day of worry for Cancer and joy for Virgo | आजचे राशीभविष्य, २८ जून २०२३ : कर्कसाठी काळजीचा अन् कन्येसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य, २८ जून २०२३ : कर्कसाठी काळजीचा अन् कन्येसाठी आनंदाचा दिवस

googlenewsNext

मेष: आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात.  आणखी वाचा 

वृषभ: आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात.  आणखी वाचा 

मिथुन: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल.  आणखी वाचा 

कर्क: आपल्यासाठी चंद्र चवथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात.  आणखी वाचा 

सिंह: आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखाद्या सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील.  आणखी वाचा 

कन्या: आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

तूळ: आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावे लागेल.  आणखी वाचा 

धनु: आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. आणखी वाचा 

मकर: आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल.  आणखी वाचा 

कुंभ: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आणखी वाचा 

मीन: आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल.  आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope, June 28, 2023 : A day of worry for Cancer and joy for Virgo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app