Horoscope: आजचे राशीभविष्य, १३ मे २०२३, यश मिळेल मात्र सकारात्मक विचार करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 06:43 AM2023-05-13T06:43:50+5:302023-05-13T06:49:29+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope, May 13, 2023, will bring success. However, the need to think positively | Horoscope: आजचे राशीभविष्य, १३ मे २०२३, यश मिळेल मात्र सकारात्मक विचार करण्याची गरज

Horoscope: आजचे राशीभविष्य, १३ मे २०२३, यश मिळेल मात्र सकारात्मक विचार करण्याची गरज

googlenewsNext

मेष: आर्थिक बाजू बळकट राहील. यश तुमचेच असेल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. महत्त्वाचे निरोप येतील. तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. मनावरील दडपण निघून जाईल. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. आणखी वाचा 

वृषभ: नोकरीत काही बदल होऊ शकतात. कामाचा ताण वाढेल. कामानिमित्त सतत फिरणे होईल. घरी पाहुणे मंडळी येतील. त्यांच्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. आणखी वाचा 

मिथुन: अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. काहीना प्रवास घडून येईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. जीवनसाथीशी सूर जुळतील. आर्थिक आवक चांगली राहील. आणखी वाचा 

कर्क: हाती घेतलेल्या महत्वाच्या कामात अडचणी येतील. त्यामुळे थोडा मनस्ताप होईल. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. दगदग होईल, अशी कामे करू नका. प्रवास शक्यतो टाळलेला बरा राहील. अनावश्यक खर्च करणे टाळा. आणखी वाचा 

सिंह: आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मित्र मंडळीची भेट होईल. काहीना भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखी होतील. लोक तुम्हाला मदत करतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र, गैरसमज होऊ देऊ नका, फटकळपणे बोलून दुखवू नका. आणखी वाचा 

कन्या: महत्त्वाच्या प्रकल्पात अडचणी येतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आर्थिक व्यवहार जपून करा. लेखी नोंदी ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या, खाण्या पिण्याचे पथ्य पाळा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. सहकारी वर्गाची साथ राहील. आणखी वाचा 

तूळ: सामाजिक क्षेत्रात असणाऱ्यांना सतत व्यस्त राहावे लागेल. तुमचे महत्व वाढेल. मात्र, मनात काही शंका असतील, मुलांची काळजी घ्या. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. जुन्या लोकांची भेट होईल. आणखी वाचा 

वृश्चिक: नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. कामाचा ताण राहील. घरात किरकोळ कारणावरून वाद वाढवू नका. घरी पाहुणे येतील. जुने वाद उकरून काढू नका. विरोधकांच्या कारवाया चालू राहतील. जीवनसाथीची काळजी घ्या. आणखी वाचा 

धनु: जवळच्या प्रवासाचा योग येईल. सतत धावपळ सुरु राहील. व्यवसायात व्यस्त राहाल. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांशी काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मुलांचे कौतुक होईल. त्यांच्याशी संवाद ठेवा. आणखी वाचा 

मकर: - आर्थिक आवक बऱ्यापैकी राहील. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात यश मिळेल. मात्र, काही मुध्यांवर वाद होऊ शकतात. नोकरीत तुमचे महत्व सर्वाच्या लक्षात येईल. एखादा सहकारी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. थोडे सावध राहा. आणखी वाचा 

कुंभ: तुमच्या समोर असलेल्या अडचणी दूर होतील. यश मिळेल. मात्र, सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. तुमच्या नावलौकिकात भर पडेल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. खाण्या पिण्याची काळजी घ्या. अडलेली कामे मार्गी लागतील. आणखी वाचा 

मीन: आपण हाती घेतलेल्या कामात अडथळा येऊ शकतो. त्या दृष्टीने विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे. कामे झालीच पाहिजेत, असा आग्रह करू नका. प्रवासात दगदग होईल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope, May 13, 2023, will bring success. However, the need to think positively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app