आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:56 AM2024-05-07T06:56:35+5:302024-05-07T07:03:58+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष
आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल.आणखी वाचा
वृषभ
आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क
चंद्र 07 मे, 2024 मंगळवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आई कडून लाभ होईल. आणखी वाचा
सिंह
आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापॅट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आणखी वाचा
कन्या
आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. आणखी वाचा
तूळ
आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. आणखी वाचा
वृश्चिक
आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुला कडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल. आणखी वाचा
धनु
चंद्र 07 मे, 2024 मंगळवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
मकर
आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. आणखी वाचा
कुंभ
आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. आणखी वाचा
मीन
आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. आणखी वाचा