Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ मे २०२३: आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 07:13 AM2023-05-08T07:13:44+5:302023-05-08T07:14:34+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's Horoscope, May 8, 2023: Today, your unfinished work will be completed, financial gain will come | Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ मे २०२३: आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होईल

Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ मे २०२३: आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होईल

googlenewsNext

मेष:  चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. आणखी वाचा 

वृषभ: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज संसारात व दांपत्य जीवनात सुख - शांती अनुभवाल. कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील. धनलाभ होईल. आणखी वाचा 

मिथुन: चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा 

कर्क: आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल. पेमीजनांत वाद - विवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास त्रास होईल. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. आणखी वाचा 

कन्या: आज कोणत्याही कार्यात विचार पूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. भावंडाकडून फायदा होईल. शत्रूचा सामना करू शकाल. आणखी वाचा 

तूळ: आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद संभवतात. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस साधारणच आहे. तन - मनाला सुख - आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा 

मकर: आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी व संततीचा सहवास लाभेल. खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर बाजारातून फायदा होईल. आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. वरिष्ठ व वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल. आणखी वाचा 

मीन: मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. नशिबाची साथ लाभणार नाही. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope, May 8, 2023: Today, your unfinished work will be completed, financial gain will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app