आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:49 AM2024-05-08T06:49:33+5:302024-05-08T07:09:08+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष
कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने घरातील वातावरण कलुषित होईल. कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. आणखी वाचा
मिथुन
पत्नी व संतती कडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. आणखी वाचा
कर्क
नोकरी - व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. आणखी वाचा
कन्या
आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.आणखी वाचा
तूळ
सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. व त्यांच्या वापरासाठी संधी सुद्धा मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक
आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल. मातुल घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभेल. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा
कुंभ
चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. आणखी वाचा
मीन
वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा