आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२३: रागामुळे स्वतःचीच हानी होईल, डोके शांत ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 07:09 AM2023-09-26T07:09:48+5:302023-09-26T07:10:21+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, September 26, 2023: Anger will harm itself, keep a calm head | आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२३: रागामुळे स्वतःचीच हानी होईल, डोके शांत ठेवा

आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२३: रागामुळे स्वतःचीच हानी होईल, डोके शांत ठेवा

googlenewsNext

मेष- 26 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा. आणखी वाचा

 

वृषभ-  आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्याना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळे मनास आनंद होईल. आणखी वाचा

 

मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. आणखी वाचा

 

कर्क- आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील. आणखी वाचा

 

सिंह- आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा

 

कन्या- आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल.  आणखी वाचा

 

तूळ- आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. आणखी वाचा

 

वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. आणखी वाचा

 

धनु- आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल. आणखी वाचा

 

मकर-  आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. कामे सहजपणे पार पडतील. आणखी वाचा

 

कुंभ- आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. आणखी वाचा

 

मीन-  आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, September 26, 2023: Anger will harm itself, keep a calm head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app