Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२३, प्रिय व्यक्तीसह प्रेममिलाप होऊ शकेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 07:31 AM2023-02-26T07:31:16+5:302023-02-26T07:33:27+5:30
Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह आनंदात व् उत्साहात वेळ जाईल. आणखी वाचा
वृषभ - आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. आणखी वाचा
मिथुन - अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आणखी वाचा
सिंह - आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूवर मात करू शकाल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. आणखी वाचा
कुंभ - आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा
मीन - आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा