Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 07:33 AM2023-02-13T07:33:31+5:302023-02-13T07:34:31+5:30
Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष - आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा
कर्क - आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने सुद्धा मन दुःखी होईल. आणखी वाचा
सिंह - आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा
कन्या - आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा
तूळ - चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. आणखी वाचा
वृश्चिक - आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. आणखी वाचा
धनु - आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. आणखी वाचा
मकर - आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. आणखी वाचा
कुंभ - आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. मौज - मजेसाठी जास्त खर्च कराल. आणखी वाचा
मीन - आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. आणखी वाचा