Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:43 PM2022-12-30T12:43:24+5:302022-12-30T12:46:24+5:30

Varshik Rashi Bhavishya 2023: नवे वर्ष २०२३ हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी...

yearly horoscope 2023 know about effect on all zodiac signs and what your rashi says varshik rashi bhavishya 2023 in marathi | Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष!

Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष!

googlenewsNext

मेष: सन २०२३ वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. रवि व बुध आपल्या भाग्यस्थानी असतील.अनेक कार्यात यश संपादित कराल. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊन आपणास समाधान लाभेल. वडिलांशी संबंध सुधारतील किंवा त्यांच्याकडून आपणास एखादा मोठा लाभ होऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी... अधिक वाचा

वृषभ: २०२३ ची सुरुवात आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. हळूहळू परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल व आपण जीवनात प्रगती पथावर विराजमान व्हाल. आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावीच लागेल. वर्षाच्या उत्तरार्धात कुटुंबात एखादे शुभ कार्य सुद्धा होईल. प्राप्तीत वृद्धी होत... अधिक वाचा 

मिथुन: आपल्यासाठी २०२३ हे वर्ष बरेच काही नावीन्याने भरलेले आहे. जानेवारी पासूनच आपले भाग्य फळफळून आपणास नशिबाची साथ मिळू लागेल. आपली प्रलंबित कामे होऊ लागतील. परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. आपणास मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.  आपण व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक आघाडीवर सुद्धा... अधिक वाचा 

कर्क: २०२३ चे वर्ष आपणास अनुकूल असणार आहे. वर्षाच्या सुरवातीपासूनच नशिबाची साथ आपणास मिळत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपली बरीचशी कामे होऊ शकतील. आपली प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. आपणास मान- सन्मान प्राप्त होईल. काही नवीन कामे हाती घेऊन त्यात यशस्वी सुद्धा व्हाल. नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न... अधिक वाचा 

सिंह: २०२३ चे वर्ष आपल्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी घेऊन येणारे आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्या आत्मविश्वासाचे स्तर उंचावलेला असेल. आपणास प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. सर्व समस्यांवर मात करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. एखादी इच्छा पूर्ण झाल्याने आपणास अतिशय आनंद होईल. हे वर्ष गुंतवणुकीसाठी... अधिक वाचा 

कन्या: २०२३ चे वर्ष आपल्यासाठी मिश्रा फलदायी आहे. ह्या वर्षी आपणास सर्वात जास्त आपल्या कुटुंबाची काळजी वाटेल.प्रॉपर्टीशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्ती होऊ शकते. आपण आपल्या व्यवसायात प्रगती साधू शकाल. आपणास एखादे मोठे यश मिळू शकेल. आपणास मित्रांचा पाठिंबा मिळेल. शासनाकडून... अधिक वाचा 

तूळ: २०२३ चे वर्ष खूपच चांगली बातमी घेऊन येत आहे. आपणास आपल्या कार्यक्षेत्रात पाय घट्ट रोवण्याची व आपल्या योजनांना साकारण्याची संधी मिळेल. कामात व्यस्त राहूनही आपल्या कुटुंबियांना आवश्यक तितका वेळ देऊ शकाल. आपणास मित्रांचे सहकार्य मिळेल. ते आपल्या पाठीशी उभे असलेले दिसतील. हे वर्ष आपणास यशाच्या शिखरावर... अधिक वाचा 

वृश्चिक: २०२३ चे वर्ष बहुतांशी अनुकूलता घेऊन येणारे आहे. आपला आत्मविश्वास उंचावून यावर्षी नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. यावर्षी विरोधक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील.असे असले तरी ते आपल्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत. विदेश प्रवास संभवतो. समाजात आपली प्रतिष्ठा उंचावेल. आर्थिक लाभासह... अधिक वाचा

धनु: सन २०२३ या वर्षात जीवनातील अनेक क्षेत्रात आपण यशस्वी व्हाल व त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. आपली कामे योग्य प्रकारे करावीत. असे केल्यानेच आपण इतर क्षेत्रात प्रतिष्ठा व पैसा मिळवू शकाल. एखादा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो. व्यापारात थोडी जोखीम पत्करून आपल्या कामात आपण प्रगती कराल. आपल्या मुलांच्या कारकिर्दीसाठी हे वर्ष... अधिक वाचा 

मकर: सन २०२३ च्या वर्षाच्या सुरुवातीस परदेश गमनाची संधी मिळेल. मनात धार्मिक विचारांची वृद्धी होईल. भावंडांच्या बाबतीत आपण जागरूक राहाल व त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एखादे मोठे पाऊल उचलाल. विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. वाद टाळणे उपयुक्त ठरू शकेल. आपण एखादी महागडी वस्तू किंवा मोबाइल खरेदी करू शकाल. कार्यक्षेत्रात यश, प्रगती... अधिक वाचा 

कुंभ: २०२३ चे वर्ष खुशखबर घेऊन येणारे आहे. आरोग्याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल. आपण जर नोकरी करत असाल तर आपली पगारवाढ होऊ शकते. आपण जर व्यापार करत असाल तर आपला नफा वाढेल. मित्रांपासून जरा जपून राहावे. परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. सरकारी क्षेत्राच्या एखाद्या चांगल्या योजनेचा... अधिक वाचा

मीन: सन २०२३ हे वर्ष अनुकूल ठरू शकेल. ज्या क्षेत्रात कार्यरत असाल, तेथे आपल्या बुद्धी व ज्ञानाच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. प्राप्तीच्या दृष्टिकोनातून बघितल्यास आपण आर्थिक दृष्ट्या उत्तम स्थितीत असाल. आपणास आपल्या भावंडांचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. ज्ञान व बुद्धीच्या जोरावर जवळ जवळ सर्वच क्षेत्रात... अधिक वाचा 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: yearly horoscope 2023 know about effect on all zodiac signs and what your rashi says varshik rashi bhavishya 2023 in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app