14 डिसेंबर, 2025 रविवारी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल.