Lokmat Astrology

दिनांक : 03-Dec-24

राशी भविष्य

 मेष

मेष

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या महिन्यात आपले मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने आपणास विचारपूर्वक खर्च करावा लागेल. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनेकदा विचार करणे हितावह होईल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनातील आकर्षण जाणवेल. वैवाहिक जोडीदाराशी रोमांस होईल. आपण एकत्रितपणे आपल्या सर्व जवाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या आणाभाका घ्याल. एकमेकांची काळजी सुद्धा घ्याल. सासुरवाडी कडील लोकांशी संबंध बिघडण्याची संभावना असल्याने भांडण होणार नाही ह्याची थोडी काळजी घ्यावी. प्रणयी जीवनासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकाल. तिच्यासाठी एखादी भेटवस्तू घेऊ शकता. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांपासून सावध राहावे. त्यांच्या पैकी एखादी व्यक्ती आपणास त्रास देऊ शकते. व्यावसायिकांना ह्या महिन्यात चांगले यश मिळू शकते. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यथायोग्य यश मिळेल.

राशी भविष्य

03-12-2024 मंगळवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA शुक्ल​ द्वितीया

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 12:26 to 13:49

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 9:18 to 10:6 & 12:30 to 13:18

राहूकाळ : 15:11 to 16:34