Lokmat Astrology

दिनांक : 23-Apr-25

राशी भविष्य

 तूळ

तूळ

हा महिना आपणास मिश्र फले देणारा आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना काहीसा प्रतिकूल आहे. वजन वाढ हि एक समस्या ठरू शकते. कोलेस्ट्रॉल व यकृतातील मेद आपणास त्रस्त करू शकतात. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल आहे. आपल्या मेहनतीवर त्यांचा विश्वास असेल. ते जी मेहनत करत आहेत ती त्यांच्या उपयोगी आल्याने त्यांना फायदा सुद्धा होईल. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना सावध राहावे लागेल. व्यापारात अचानक आलेली तेजी चुकीचे निर्णय घेण्यास कारणीभूत ठरण्याची संभावना असल्याने आपणास सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना चांगली प्राप्ती होईल. त्यांची पगारवाढ संभवते. त्यांची पदोन्नती सुद्धा संभवते. ह्या महिन्यात आर्थिक आघाडीवर सावध राहावे लागेल. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळाले तरी प्राप्ती होण्यास वेळ लागेल व खर्च चालूच राहतील. त्याचा आपणास त्रास होऊ शकतो. प्रणयी जीवनात आपणास सावध राहावे लागेल. आपली प्रेमिका जेव्हा एकटी असेल तेव्हाच तिला मागणी घाला, अन्यथा एखादी व्यक्ती समस्या निर्माण करू शकते. विवाहितांच्या जीवनात दुरावा निर्माण होण्याची संभावना असल्याने त्यांना आपल्या संबंधांची काळजी घ्यावी लागेल.

राशी भविष्य

22-04-2025 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : श्रावण

अमृत काळ : 12:34 to 14:10

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:38 to 9:26 & 11:50 to 12:38

राहूकाळ : 15:45 to 17:20