हा आठवडा आपल्यासाठी संघर्षमय असू शकतो. परंतु आपली मेहनत व संघर्ष आपणास यशाच्या मार्गावर नेऊन सोडेल. आठवड्याच्या सुरवातीस काही समस्या असू शकतात, परंतु आठवड्याच्या अखेर पर्यंत आपणास सुखद परिणाम मिळतील. कामा निमित्त जवळचा किंवा दूरवरचा एखादा प्रवास संभवत असल्याने आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरची कामे करणाऱ्यांना मानसिक तणावाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात योग्य प्रमाणात लक्ष द्यावे लागेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आठवड्या अखेरीस प्रेमिके कडून आपणास एखादी भेटवस्तू मिळू शकते. आपले दांपत्य जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात एखादी प्रतिष्ठित व्यक्ती मदतीसाठी आपणास सहकार्य करेल.